मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : जेनेलियाने यंदा रितेशला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट दिले याची चाहत्यांना उत्सुकता आहे. कारण, ४२ व्या वाढदिवसाला जेनेलियानं रितेशला एक खास गिफ्ट दिलं होतं.‘टेस्ला एक्स’ ही कार देत तिने रितेशला त्याला सुखद धक्का दिला होता. आपल्या ४२ वाढदिवसाला मिळालेली ही ‘लय भारी’ भेट पाहून त्यानं हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. ‘ब्रँड न्यू’ कारसोबत रितेशनं त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. ‘४२ वर्षाच्या बर्थडे बॉयला २० वर्षाचा असल्याची जाणीव कशी करून द्यायची, हे माझ्या बायकोला बरोबर माहित आहे.कॅप्शनही रितेशनं फोटोला दिलं आहे.
https://www.instagram.com/p/Bc344kohTxd/?utm_source=ig_web_copy_link