Home औरंगाबाद दसऱ्याला झेंडूच्या फुलांना महत्व का दिले जाते?

दसऱ्याला झेंडूच्या फुलांना महत्व का दिले जाते?

515
0

सण – उत्सवात झेंडूलाच अधिक महत्व का दिले जाते?
भारतात कोणताही सण -उत्सव असो दारात झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. तर झेंडूंच्या फुलांची रांगोळी काढली जाते. प्रत्येक सणाला झेंडूलाच का प्राधान्य दिले जाते?
जाणूयात झेंडूचे महत्व : दसरा हा सण विजयाचे प्रतीक मानले जाते.या दिवसात फुले बहरण्याचा काळ असतो. झेंडूचा पिवळा आणि केशरी रंग आकर्षक असतो आणि हे फुले कुठेही सहज उपलब्ध होतात. अशात या सणात झेंडूचे फुलं घरोघरी सजावटीसाठी, पूजेसाठी कामास घेतले जातात. देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचा वापर होतो.आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे हे फुलं खास आहेत. या रंगामुळे ते सोनेरी असल्याचे जाणवतं आणि तसेही पिवळा, केशरी किंवा सोनेरी रंग शुभ मानले गेले आहे. झेंडूच्या फुलांचा रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करते .या फुलांचे धार्मिक महत्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे म्हणून विजयाच्या सणावर झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी झेंडूची फुले वापरण्याचं महत्त्व आहे.या फुलाला “हिरण्यगर्भ पुष्प” देखील म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू.झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. साधरण दोन ते तीन दिवसही फुले कोमेजत नाही.एकाच रंगामध्ये विविध छटा, लहान-मोठे, टोकदार-पसरट पाकळ्यांचे आकार या फुलाला अधिक आकर्षक बनवतात.”मेरीगोल्ड” नावाचं हे फुलं सूर्याचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते . प्राचीन ग्रंथाप्रमाणे हे फुल सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. याला संस्कृतमध्ये “स्थूल पुष्प” या नावाने ओळखतात. हे दिव्य शक्तींसह सत्याचे प्रतीक मानले गेले आहे.पिवळा रंग देवाप्रती समर्पणाचे प्रतीक आहे. याच्या सुंगधाने नकारात्मक शक्ती दूर होऊन ताण कमी होण्यास मदत होते.
हे वातावरणाला शांती प्रदान करणारा फुल आहे.

औषधी गुणधर्म असलेले असे झेंडू :
तोंडाचे आरोग्य, जखमेवर तसेच त्वचा रोगापासून आराम मिळतो. मूत्रविकारात देखील झेंडूच्या औषधी गुणधर्मांचा फायदा होतो. दमा, श्वसनाच्या आजारांवर देखील झेंडू उपयुक्त आहे.

म्हणून झेंडूला भारतीय संस्कृतीत अधिक महत्व दिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here