Home वाचककट्टा ‘जो पाजेल आमच्या नवऱ्याला दारु, त्याला आम्ही आडवे पाडू’…!

‘जो पाजेल आमच्या नवऱ्याला दारु, त्याला आम्ही आडवे पाडू’…!

56
0

मराठवाडा साथी न्यूज

११० गावांनी केला दारुमुक्त निवडणुकीचा ‘संकल्प’…!

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आदर्श संकल्प समोर आला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीसह ११० गावांनी दारुमुक्त निवडणूक करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांना दारुचे वाटप करु देणार नाही आणि तश्या स्थितीमध्ये मतदान करू देणार नाही.असा संकल्प महिला मतदारांनी केला आहे. ‘जो पाजेल आमच्या नवऱ्याला दारु, त्याला आम्ही आडवे पाडू’, महिला मतदारांनी अशी भूमिका घेतली आहे.

आपले मत व्यक्त करीत जिल्हा दारू बंदी संघटनेने सांगितले की,“दारूमुळे आदिवासींचे, मजुरांचे होणारे शोषण व महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी व विविध गावांनी एकत्र येऊन दारूमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दारूबंदीसाठी १९८७-९३ या कालावधीत जिल्हाव्यापी आंदोलनं झाली. आंदोलनाची दखल घेऊन शासनाने १९९३ मध्ये शासकीय दारूबंदी लागू केली. १९९३ पासून २०१५ पर्यंत गावा-गावात दारूबंदी लागू झाली. आताच्या घडीला ही ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरु आहेत,”

दरम्यान,गडचिरोली जिल्ह्यातील ११० गावे दारूबंदी सोबत उभी राहिली आहेत.फक्त एव्हढेच नाही तर या गावांनी या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा,असे पत्र जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here