Marathwada Sathi

बॉलिवूड मध्ये सगळ्यात जास्त प्रॉपर्टी कोणाकडे…?

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यानं या यादीत स्थान मिळवलं आहे. फक्त सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करतो म्हणूनच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या कारणामुळंही त्याची इथं निवड करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर अक्षयचे तब्बल १३१ मिलियन फॉलोअर्स आहेत. एक अभिनेता असण्यासोबतच तो आपली सामाजिक जबाबदारी जाणत कायमच गरजूंच्या मदतीसाठीही पुढाकार घेताना दिसतो. कोविड-19 च्या आव्हानात्क काळातही खिलाडी कुमारनं तब्बल ‘४ मिलियन’ यूएस डॉलर्स इतकी रक्कम दान स्वरुपात दिली होती.मे महिन्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून “आई फॉर इंडिया” या कॉन्सर्टमध्येही तो सहभागी होता. ज्या माध्यमातून कोविड-19 मदतनिधीसाठी ५२० मिलियन रुपये गोळा केले.

दरम्यान, फोर्ब्सच्या यादीनुसार अक्षय कुमारने यंदाच्या वर्षी जवळपास ३६२ कोटी रुपयांची कमाई केली. हीसुद्धा त्याच्या एकाच चित्रपटाची कमाई आहे. यंदाच्याच वर्षी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होता. जगभरातील कमाईच्या बाबतीत म्हणावं तर, या यादीत तो सहाव्या स्थानावर आहे .

Exit mobile version