Home औरंगाबाद कोण आहे ‘टिप्या’?

कोण आहे ‘टिप्या’?

104
0

टिप्या : स्टंटमॅन ते गँगस्टर

राकेश रवळे । औरंगाबाद
‘टिप्या’ कोण आहे? त्याचे डेअरिंग एवढे कसे काय? तो एका गर्लफ्रेंडला घेऊन गाडीवर डान्स करण्यापर्यंत त्याची मजल कशी काय गेली? तो थेट पोलिसांना चॅलेज देण्यापर्यंत गेलाच कसा? हे सगळे प्रश्न औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांच्यासमोर चिंता निर्माण करणारे आहेत. त्यामुळे या ‘टिप्या’चा उदय आणि त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे.
शेख जावेद मकसुद उर्फ टिप्या हा विशालनगर गारखेड्यातील रहिवासी आहे. महागड्या गाड्यांवरून कॉलेज परिसरात फिरणे, तिथे स्टंट करून पोरींवर इंप्रेशन मारणे हा त्याचा छंद होता. जो तरूण प्रत्येक कॉलेज गोईंग स्टूडंटचा असतो तसाच तो होता. या गाड्या तो स्वत: घेत नव्हता, तर इतरांच्या गाड्या हिस्काऊन घेऊन ते काम करीत होता. स्टंट करण्यासाठी ज्यांच्या गाड्या घ्यायाचा त्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले तर तेही तो देत नव्हता. निव्वळ डेअरींग आणि दादगिरीच्या जोरावर टिप्याचे हे सगळे खेळ सुरू होते. हा काळ होता २००७-२००८ चा. याच काळात तो दादागिरीच्या जोरावर गुन्हेगारीकडे वळत होता.

त्याचे टार्गेट होते ११वी १२ वीचे मुले
नव्याने कॉलेज विश्वात प्रवेश केलेल्या मुलांना तो डेअरिंगने आणि दहशतीने त्यांच्या गाड्या हिस्काऊन घेऊन स्टंट करीत होता. देवगिरी कॉलेज ते छत्रपती कॉॅलज हा त्याचा कोअर एरिया आहे. ज्या ठिकाणी त्याचा अड्डा असतो. हे सगळे विशीतील तरूणाला जे करावे वाटते, तेच टिप्या करीत होता. टिप्याला कुटूंब आहे किंवा नाही, याची माहिती नाही. फक्त घरी त्याची आई असल्याचे लोक सांगतात. पण टिप्याचे आणि त्याच्या आईचेही तेवढे चांगले संबंध नसल्याची चर्चा आहे. या गाड्या घेण्यावरून मारामाऱ्या करणे अशा पद्धतीने त्याचे गुन्हेगारी विश्वात पदार्पण झाले. मारामारा करतांना शस्त्र वापरू लागला : मारामाऱ्या करण्यासाठी एकतर शरीर पिळदार किंवा अंगात ताकद लागते, तर टिप्याचे अगदी उलट होते. किरकोळ देहयष्टी असणारा टिप्या, हा जवळ धारदार शस्त्र ठेऊन दहशत निर्माण करू लागला. त्यांच्याकडे असणारे चाकु, जांबिया, सुरे यांना लोक घाबरून त्याला पाहिजे ते देत असत. त्यातूनच त्याचे डेअरिंग वाढत गेले. तो नामचीन गुंडा झाला.

स्टंटमॅन ‘सिंघम’ टिप्याचा आयडॉल
बॉलिवुड अॅक्टर अजय देवगण, अनिल कपुर यांचा टिप्यावर प्रभाव आहे. अजय देवगणच्या प्रत्येक सिनेमातील स्टंट पाहून तश्याच्या तसेच स्टंट तो प्रत्यक्षात करीत होता. अगदी ‘सिंघम’ स्टाईल स्कार्पिओ गोल फिरविण्याचा स्टंटही टिप्या अगदी सफाईदार पद्धतीने करू शकतो. असे स्टंट करण्यात टिप्याचा हातखंडा आहे. त्याला सिनेमात ज्या पद्धतीने घोडे उचकवतात, त्याच पद्धतीने घोडे उचकावण्याचा शौकही टिप्याला लागला होता.

अत्तराचा शौकिन टिप्या
गुन्हेगारी जगतात असणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींचा शौक असतो. तसा टिप्याला अत्तर वापरण्याचा शौक आहे. असे सांगतात की त्याच्या घरात गेल्यानंतर एका कपाटात देश आणि विदेशातील अत्तरांच्या बाटल्यांच्या रांगाच रांगा आहेत. अगदी दुबईपासून ते विदेशातील अनेक ब्रॅण्डचे अत्तर टिप्याच्या संग्राहात आहेत, असे त्याचे जवळचे लोक सांगतात.

ना गँग ना फंटर अकेला टिप्याही काफी है
डेअरींगबाझ टिप्याचे ना गँग आहे, ना कुणी खास असा फंटर. टिप्या अकेलाही काफी है, अशी त्याची दहशत आहे. एकट्याने गुन्हे करण्यासाठी मोठी डेअरींग लागते. त्याशिवाय दहशत निर्माण होत नाही. पण टिप्याने एकट्याच्या हिंमतीवर पुंडलिकनगर, भारतनगर, विशालनगर, गजाजननगर, हनुमाननगर या परिसरपासून ते उस्मानपुऱ्यापर्यंत त्याने दहशत निर्माण केली आहे.

‘टिप्या’हायटेक
गुन्हेगार असूनही टिप्या हायटेक आणि टेक्नोसॅव्ही आहे. त्याचे फेसबुक अकाऊंट अपटेड असते. तो कुठे शिकला, याची माहिती जरी मिळत नसली. तरी त्याचे इंग्रजी चांगले आहे. त्याचे मॅसेज आणि इतर गोष्टींवरून ते सिद्ध होते. त्यामुळे टिप्याला एवढ्या लाईटली पोलिस घेत असले तरी तो टेक्नॉलीजीत शार्प आहे. िटप्या हा ज्ञानप्रकाश शाळेचा विद्यार्थी असल्याची चर्चा आहे.

चाकु वापणाऱ्या टिप्या हाती ‘कट्टा’
कधीकाळी चाकुच्या धाकावर दहशत निर्माण करणाऱ्या टिप्याच्या हाती गावठी ‘कट्टा’ आला. तेच कारण त्याला जास्त डेअरींग करण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. त्यामुळे त्याची दहशतही वाढली आहे. त्याचा फायदा घेऊनच तो गर्लफ्रेंडसोबत त्याने एका आमदाराच्या ऑफिससमोर दारू पित डान्य केला. त्यामुळे त्याला पुंडलिकनगर परीसरातील गुन्हेगारही घाबरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here