Marathwada Sathi

कार्तिकचा ‘धमाका’ कुठे होणार प्रदर्शित…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कार्तिक आर्यनच्या आगामी ‘धमाका’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.दरम्यान,हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.निर्मात्यांना चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याबरोबरच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी इच्छा आहे. अशा परिस्थितीत आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. २२ नोव्हें.ला चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि शूटिंग डिसेंबरमध्ये १० दिवसात पूर्ण झाले होते.

दरम्यान,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी यांनी चित्रपट लवकरात लवकर रिलीज करण्याची शक्यता दर्शवली आहे.

Exit mobile version