Home महाराष्ट्र कुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात...

कुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

9253
0

मुंबई : आगोदरच लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना वाढत्या इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडली असून डिझेलचा दरही ९० रुपयांच्या वर गेला आहे. ही दरवाढ अशीच चालू राहिली तर डिझेल देखील शंभरी गाठण्यास वेळ लागणार नाही. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना नागरिक महागाईने हैराण झाले आहेत. अनलॉक होताच इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करत आहे. कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट, कुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा तर कुठे ग्राहकाला गुलाब देत गांधीगिरी पद्धतीने मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. औरंगाबाद शहरात पेट्रोलचा दर १०२ रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. काँग्रेसच्या वतीने शहरात विवविध पंपांवर इंधन दरवाढीविरोधात फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. पुण्यात काँग्रेसने चक्क घोडागाडी आणत आंदोलन केले. पुण्यातील कुलकर्णी पेट्रोल पंपावर केंद्र सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. सोलापुरात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट मारत निषेध नोंदवला. तर दुसरीकडे पेट्रोल परवडत नसल्याचे सांगत गाड्या भंगारात विकल्या, अशा प्रकारचे उपरोधिक आंदोलन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. येवला शहरात पंपावर इंधन भरण्यास आलेल्या ग्राहकाला गुलाब पुष्प देत पेट्रोल मशिनला हार घालण्यात येऊन घोषणाबाजी कारण्यात आली. चंद्रपुरात “मोदी पेट्रोल-100 रुपये लिटर” अशा आशयाची पेट्रोल पंपची प्रतिकृती तयार करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here