Marathwada Sathi

व्हॉट्सअॅप ने घेतले एक पाऊल मागे…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपने मागील काही दिवसांपासून नवे धोरण लागू करण्यासाठीची सुरुवात केली होती.यासाठी युझर्सना हे नवे धोरण स्वीकारण्यासाठीचे आवाहनही करण्यात आले.मात्र,व्हॉट्सअॅप चे हे नवे धोरण न स्वीकारणाऱ्यांचे अकाऊंट बंद होणार असल्याची बाबही स्पष्ट करण्यात आली होती.त्यामुळे मोठ्या संख्येने हे अॅप वापरणाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळाली.युझर्सच्या या नाराजीनंतर व्हॉट्सअॅप ने पुन्हा एक पाऊल मागे घेऊन गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय़ घेतला आहे.या नव्या धोरणाला अनुसरून युजर्समध्ये बऱ्याच प्रमाणात संभ्रम आहेत.हे धोरण युजर्सना समजून घेण्याचा वेळ देण्याकरीता हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.

दरम्यान,व्हॉट्सअॅप कडून मिळालेल्या माहितीनुसार,’८ फेब्रु.ला कोणालाही व्ह़ॉट्सअॅप अकाऊंट सस्पेंड अथवा डिलीट करावे लागणार नाही. या अॅपवर गोपनीयता आणि सुरक्षितता धोरण कशा प्रकारे काम करते याकरिता आम्ही सुरुवात करत आहोत.१५ मे रोजी नवा अपडेट पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी आम्ही या धोरणाबाबतचे संभ्रम दूर करु’,असे म्हटले गेले आहे.

Exit mobile version