Marathwada Sathi

व्हॉट्सअ‍ॅपने सुरु केले ‘Stay Safe with WhatsApp’ अभियान

व्हॉट्सअ‍ॅप हे लोकांशी संवाद साधण्याचे एक साधन आहे. यात आपण एकमेकांशी बोलू शकतो. व्हिडिओ कॉल् करणे, आपला फोटो किंवा अन्य गोष्टी पोस्ट करणे (स्टेट्स ठेवणे) यासारख्या बऱ्याच गोष्टी या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येतात. व्हॉट्सअ‍ॅप हे एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून,ते नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने गेल्या वर्षी अनेक नवीन फीचर्स लाँच केले होते.

मेटा ही इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी आहे. वापरकर्त्यांसाठी व्हाट्सअ‍ॅपने एक नवीन सुरक्षा मोहीम सुरु केली आहे. ‘Stay Safe with WhatsApp’ ही मोहीम वापरकर्त्यांना त्याची ऑनलाईन सुरक्षेचे नियंत्रण आणि सुरक्षितपणे मेसेज करण्याचा अनुभव याची हमी देणारी आहे. ही मोहीम वापरकर्त्यांना WhatsApp च्या इनबिल्ट फीचर्स आणि सेफ्टी टूल्सबद्दल शिक्षित करते. यामुळे लोकांना ऑनलाईन घोटाळे, फसवणूक आणि अकाउंटमध्ये होणार छेडछाड असे धोके टाळता येणार आहे. ही मोहीम वापरकर्त्यांना WhatsApp ची ही मोहीम तीन महिने चालणार आहे.

WhatsApp वापरकर्त्यांना टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी आपल्या अकाउंटमध्ये सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर जोडण्याची परवानगी देते. ज्यासाठी तुम्हाला तुमचे अकाउंट रिसेट आणि व्हेरीफाईड करत असताना ६ आकडी पासवर्डची आवश्यकता असते. तुमचे सिमकार्ड चोरीला गेले किंवा तुमच्या फोनमध्ये कोणी छेडछाड केली तर हे फिचर उपयुक्त ठरते.

मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना अकाउंट ब्लॉक आणि रिपोर्ट करण्याचा एक सोपा मार्ग देखील देते. ब्लॉक केलेले कॉन्टॅक्ट तुम्हाला फोन किंवा मेसेज करू शकत नाहीत. वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक डिटेल्स ज्यामध्ये प्रोफाइल फोटो, लास्ट सिन, अबाऊट स्टेट्स इत्यादी गोष्टींवर देखील नियंत्रण ठेवू शकतात.

व्हाट्सअ‍ॅप वापरकर्ते हे देखील ठरवू शकतात की त्यांना व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमधून कोणाला Add करायचे आणि कोणाला नाही. यामुळे तुमची प्रायव्हसी वाढते. तुम्ही लोकांना तुम्हाला ज्या ग्रुपचा भाग बनवू इच्छित नाही त्या ग्रुपमध्ये Add करण्यापासून रोखू शकता. याशिवाय आता वापरकर्ते ग्रुपमधून लेफ्ट देखील होऊ शकतात.

Exit mobile version