Home मुंबई भाजप आणि सेनेच्या ‘हिंदुत्त्वात’ काय फरक आहे…?

भाजप आणि सेनेच्या ‘हिंदुत्त्वात’ काय फरक आहे…?

432
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : महाराष्ट्र राज्यात नुकतेच महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले.असं असलं तरी विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरलं असं म्हणत सरकारवर हल्लोबोलही केला. तसंच अनेकदा विरोधकांकडू शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही हल्लाबोल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं असल्याची भूमिका शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. वर्षपूर्तीनिमित्त नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.“आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळं आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझं हिंदुत्व आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपाचं हिंदुत्व राजकीय हिंदुत्व आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर ते आपल्या हिंदुत्वाला योग्य मानतात तर पीडीपी सोबत कसे गेले? आम्ही त्यांच्या सोबत होतो. परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचं हिंदुत्व? त्यांचं एका राज्यात वेगळं हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळं हिंदुत्व असतं. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here