Marathwada Sathi

या दोघांनाही शेतीतलं काय कळतं…?

मराठवाडा साथी न्यूज

कणकवली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना पाठिंबा देण्याकरीता आज(७ जाने.)भाजपकडून सिंधुदुर्गात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नारायण राणे यांनी राहुल गांधी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.ते बोलतांना म्हणाले की,गेल्या ७० वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमले नाही ते मोदींनी करून दाखवले आहे.ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी कधीच काही केले नाही तेच आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे.यापूर्वी शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला बंधने होती,तोट्यात माल विकला जायचा.सत्तर वर्षातील हे नियम मोदींनी मोडून काढले. आज त्यालाच काँग्रेसने विरोध सुरू केला आहे,अश्याप्रकारे राणे यांनी काँग्रेस वर टीका केली.

पुढे राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न करत राणे म्हणाले की,काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या दोघांनाही शेतीतलं काय कळतं? असे विचारतानाच कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो, हे तरी यांना माहीत आहे का? भाजप शेतकऱ्यांसाठी विधायक कामे करत आहे. भाजपच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो,असेही यावेळी राणे म्हणाले.

Exit mobile version