Home औरंगाबाद ‘मानसिक सुदृढता’ व ‘सायबर बुलिंग’ यावर राष्ट्रीय बाल रोग तज्ञ संघटना यांच्या...

‘मानसिक सुदृढता’ व ‘सायबर बुलिंग’ यावर राष्ट्रीय बाल रोग तज्ञ संघटना यांच्या मार्फत वेबिनार संपन्न

314
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : ‘राष्ट्रीय बाल रोग तज्ञ संघटना,औरंगाबाद’ विभागाच्यावतीने मुलांसाठी वेबिनार आयोजित करण्यात आला. औरंगाबाद विभागाच्यावतीने दरवर्षी बालदिनानिमित्त एक आठवडा बाल दिवस साजरा करण्यात येतो. यामध्ये १० ते १८ वयोगटातील मुलांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून विविध विषयांवर संवाद साधण्यात येतो. कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये मुलांना ज्या मानसिक स्थितीतून जावे लागले त्यावर उपाय म्हणून डॉ. अमोल देशमुख (मानसिकरोगतज्ञ), डॉ. रोहिणी सोधी (बालरोगतज्ज्ञ , इक्यू स्पेशालिस्ट), डॉ. तृप्ती बोरूळकर (बालरोगतज्ज्ञ), डॉ. निधी सोनी (बालरोगतज्ज्ञ) यांनी मार्गदर्शन केले.

मागील काही महिन्यात मुलांना जाणवणारा एकटेपणा,त्यांच्यामधील असणारे इमोशन,घरात राहिल्यामुळे कोरोनाबद्दल व कुटूंबाबद्दल निर्माण झालेली काळजी, भीती, राग यावर मनमोकळा संवाद साधण्यात आला. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले. त्याचबरोबर मोबाईलचा वाढता वापर कसा कमी करायचा यावर देखील उपाय सांगण्यात आले. नकारात्मकता आणि अपयशाला कसे सामोरे जावे. यावर डॉ.अमोल देशमुख यांनी मार्गदर्शन केले.मानसिकरित्या सुदृढ होण्यासाठी योगा, आहार, झोप आणि व्यायाम आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘राष्ट्रीय बाल रोग तज्ञ संघटना,औरंगाबाद’ विभागाचे सचिव सागर कुलकर्णी, अध्यक्ष रेणू बोराळकर यांच्यामार्फत करण्यात आले होते. वेबिनारचे संचालन डॉ संतोष रांजळकर, डॉ यशवंत गाडे यांनी केले. वेबिनारला मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here