Home मनोरंजन ‘आम्हाला मुलीचे खासगी आयुष्य सुरक्षिते ठेवायचे आहे’…!

‘आम्हाला मुलीचे खासगी आयुष्य सुरक्षिते ठेवायचे आहे’…!

274
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : काही दिवसांपूर्वीच(११ जाने.)आई-बाबा झालेल्या अनुष्का आणि विराट यांच्या मुलीला पाहण्यासाठी दोघांचा चाहता वर्ग उत्सुक आहे.दरम्यान,मिळालेल्या माहितीनुसार,विराट कोहली आणि अनुष्काने मीडियाला आवाहन केले आहे. “आम्हाला मुलीचे खासगी आयुष्य सुरक्षिते ठेवायचे आहे. त्यामुळे तिचे फोटो काढू नका किंवा प्रकाशित करु नका,”असे त्यांनी सांगितले आहे.

विराट आणि अनुष्काने शेअर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहेत की,”इतकी वर्षे आमच्यावर प्रेम करण्यासाठी तुमचे आभार. हा आनंदाचा क्षण तुम्ही सोहळ्याप्रमाणे साजरा करत आहात हे पाहून आम्ही भारावलो. पण आई-वडील म्हणून आम्हाला फारच साधारण आवाहन करायचे आहे.आम्हाला आमच्या लेकीचे खासगी आयुष्य अबाधित ठेवायचे आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आणि सहकार्याची आवश्यकता आहे.”आमच्याशी संबंधित माहिती तुम्हाला मिळेल याची आम्ही कायमच काळजी घेतली आहे.पण आम्ही दोघे तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की, तुम्ही आमच्या लेकीशी संबंधित कोणतीही माहिती प्रसारित करु नका. आम्हाला आशा आहे की, तुम्ही आमच्या भावनांचा मान राखाल आणि त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here