Home महाराष्ट्र “आपल्याकडे प्रश्नांची नाही,तर निर्णयांची कमतरता आहे”राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

“आपल्याकडे प्रश्नांची नाही,तर निर्णयांची कमतरता आहे”राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

7
0


वाढीव वीजबिलांसंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले निवेदन .

वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. . पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

विषय खूप आहेत पण सरकारने निर्णय घ्यायला हवेत. ‘, असे म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.2 हजार बिलं येत होती तिथे लोकांना 10 हजार बिलं आता येत आहेत. त्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. ही पाच पट, सहा पट बिलं बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आशा असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

सरकारचे धरसोड धोरण योग्य नाही. रेल्वे सगळ्यांसाठी सुरु नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लोकांचे प्रश्न सुटत नाही. मग सरकारचा काय उपयोग, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

पूर्वी जिथे दोन हजार बिलं येत होती, तिथे दहा दहा हजार बिलं येत आहेत. जिथे ५ हजार येत होतं, तिथे २५ हजार येत आहे. मग हे राज्य सरकारला जर माहिती आहे, तर कशामध्ये हे प्रकरण अडकलंय? इतकेच नव्हे तर वाहतूक कोंडी वाढली आहे, ट्रेन कधी सुरू होणार, रेस्टॉरंट उघडली आहेत, मंदिरं सुरू नाहीत, धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगा. अशा शब्दात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here