Home मुंबई “बायोइंधन टॅंक ” मिटवतायेत कचऱ्याच्या समस्या

“बायोइंधन टॅंक ” मिटवतायेत कचऱ्याच्या समस्या

415
0

वसई : शहरातील बाजारपेठांमधील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने बाजारपेठांमध्ये जैवइंधन टाकी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर अंबाडी रोड येथील बाजारपेठेत दोन जैवइंधन टाक्या बसविल्या जाणार आहेत. कचराभूमीत दररोज साडेसातशे मेट्रीक टन कचरा जमा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे सर्व प्रयोग अयशस्वी ठरू लागले आहे. अशा वेळी कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करणे हा पर्याय असल्याचा एक निष्कर्ष समोर आला आहे. त्यासाठी ओल्या कचऱ्याची आहे त्या ठिकाणी व्हिल्हेवाट लावून खतनिर्मिती करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यासाठी विविध प्रयोगांवर पालिकेने काम सुरू केले आहे.

“बायोइंधन टॅंक ” :
एक जैवइंधन टाकी ही ३० किलो क्षमतेची असणार आहे. नवघर माणिकपूर प्रभाग समितीच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांनी जागेची पाहणी केली आहे. याबाबत तांत्रिक माहिती तपासली असून अहवाल आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. या जैवइंधन टाकीत ओला कचरा टाकल्यावर टाकीतील विषाणू कचऱ्यावर प्रक्रिया करतात आणि त्या कचऱ्याचे रूपांतर द्रव खतात होते तसेच स्वयंपाकाचा गॅस तयार होतो. आयुक्त गंगाथरन डी. यांनी शासकीय निवासस्थानात जैवइंधन टाकी बसवली आहे. त्यातून गॅस आणि खत निघत आहे. बाजारपेठांमध्ये दररोज मोठय़ा प्रमाणावर कचरा तयार होतो. जैवइंधन टाक्यांमध्ये हा कचरा टाकल्यानंतर त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट होईल असा याचा उपयोग केला जाणार आहे. ही जैवइंधन टाकी सूर्यप्रकाशावर काम करते. त्याला कुठल्याही प्रकारच्या विद्युत जोडणी अथवा बॅटरीची गरज नसते.केरळ येथे बनवलेली जैवइंधन टाकी वसईच्या अंबाडी रोड येतील बाजारपेठेत दोन जैवइंधन टाक्या लावण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here