Marathwada Sathi

‘घर’ खरेदी करायचंय? तर हि बातमी खास तुमच्यासाठी…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : जर तुम्हाला राज्यात घर विकत घ्यायचे असेल तर हि बातमी झांसी तुमच्यासाठी आहे. कारण,राज्यात घर विकत घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी रिअल इस्टेट कंपन्यांच्या संघटनेने एक मोठी ऑफर दिली आहे. नरेडकोच्या महाराष्ट्र युनिटने आपल्या सदस्यांच्या रेसिडेन्शियल युनिट्सच्या विक्रीला चालना देण्यासाठी घरांचा स्टॅम्प ड्युटीचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. यासाठी संस्थेने आपल्या सदस्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वेळ दिली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ऑक्टोबर २०२० पर्यंत होती. रिअल इस्टेट कंपन्यांच्या स्वत: स्टॅम्प ड्युटी भरण्याच्या निर्णयानंतर घर खरेदीदारांना पूर्वीच्या तुलनेत घरं स्वस्त उपलब्ध होतील.

सरकारच्या परवडणाऱ्या म्हाडाच्या धोरणासारख्या कुठल्याही रिअल इस्टेट पॉलिसीमध्ये दिलासा मिळावा अशी NAREDCOची अपेक्षा आहे. आयकर कायद्यातील कलम-४३ (CA) आणि कलम-५६ (२) अंतर्गत देण्यात आलेल्या सूटीअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे प्रस्तावित गृहनिर्माण धोरण विकसक आणि गृहकर्जांना कर सवलत देत असल्याचे स्पष्ट करते. संघटनेचा विश्वास आहे की राज्य सरकारचं हे धोरण संस्थेच्या निवासी प्रकल्पांची मागणी वाढवण्यात मोठी मदत ठरू शकते.

Exit mobile version