Marathwada Sathi

सोशल मीडियामुळे गावची ग्रामपंचायत बिनविरोध…!

मराठवाडा साथी न्यूज

चिपळूण : दहीवली खुर्द या गावामध्ये युवकांनी एकत्र येत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर एक गृप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून वाडीतील युवकांना एकत्र बोलावून ग्रामपंचायत निवडणुकीच्या चार महिने आधी गावातच सभा लावली. या सभेत गावाच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनीच एकत्र आले पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानंतर सभेत ग्रामविकास समिती या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप काढण्यात आला.

ग्रुप च्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीला काही महिने बाकी असताना हा निर्णय घेण्यात आला.त्यादरम्यान गावातील विविध समस्या युवकांनी जाणून घेतल्या. त्यात महत्वाची समस्या म्हणजे पाण्याची. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावच्या वाहणाऱ्या नदीला बंधारे बांधण्यात आले.या बंधाऱ्यामुळे गावातील नद्या; बोरवेलच्या पाण्यांची पातळी वाढली आहे. त्यामुळे गावात घरोघरी नळपाणी योजना राबविण्यात आली. वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे शेतीयुक्त मुबलक पाणी मिळाले. या पाण्यावर गावात पडीक असलेल्या जमिनीवर फळबागा करु लागले. त्यात त्यांना अधिकाधिक उत्पन्नही मिळु लागले. या बांधलेल्या बंधाऱ्याचा फायदा गावकऱ्यांना तर झालाच. या बंधाऱ्याचे लोकार्पण मतदानाच्या दिवशी करण्यात आले. यासारखे अजूनही बंधारे बांधण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे.

Exit mobile version