Marathwada Sathi

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

मुंबई । ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांना गुरुवारी सकाळी दहा वाजता हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले होते. १९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे अविनाश यांनी सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. होत्या तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती.

Exit mobile version