Marathwada Sathi

वरुण-नताशाने बांधली लग्नगाठ

अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे झाला विवाहसोहळा

मुंबई : अभिनेता वरुण धवनने त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली आहे. २२ जानेवारीपासून यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली होती आणि अखेर या दोघांनी लग्न केले.सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

अगदी मोजक्या पाहुण्यांनाच या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांनाच आमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली होती.या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी झाले होते.

Exit mobile version