Marathwada Sathi

वरूण धवनने केला ‘साखरपुडा’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याचा साखरपुडा झालेला आहे,रेडियोवर एका चॅट शो दरम्यान असा गौप्यस्फोट अभिनेत्री करीना कपूर-खान हिने केला आहे. वरुण आणि नताशा दलाल यांचा साखरपुडा झाल्याचे यावेळी करीनाने सांगितले.यामुळे वरुणच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.वरून आणि नताशा हे एकमेकांना डेट करत असल्याचे दोघांनीही मान्य केले होते.मात्र, त्यांच्या नात्याबाबत करीना कपूर हिने आता मोठा खुलासा केला आहे.

दरम्यान, वरुण आणि नताशा दोघेही शाळेच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आणि बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.वरून आणि नताशा पुढच्या वर्षी विवाह बंधनात अडकण्याची दाट शक्यता आहे.

Exit mobile version