Home मुंबई वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर होणार…?

वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर होणार…?

60
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे.त्यानुसार आज २९ डिसेंबरला त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी वर्ष राऊत यांना ही नोटीस देण्यात आली आहे.दरम्यान,ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा यांनी जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे अशी माहिती संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले कि,’ईडी ही देशाची महत्त्वाची संस्था आहे. जर कुठला कागद हा माझ्या घरी येत असेल तर त्याचा आदर आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. माझ्याकडेही ईडीला देण्यासाठी बरीच कागदपत्र आहे. त्यामुळे नोटीसीला उत्तर हे नोटीसने दिले जाईल’.

दरम्यान,“मी अद्याप नोटीस पाहिलेली नाही.नोटीस माझ्या नावावर नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे संपूर्ण राजकारण कसे चालते मला माहिती आहे, त्यामुळे हे सुरु राहू द्या आम्ही उत्तर देऊ,” “आमच्याकडे लपवण्यासाऱखे काही नाही. कागदपत्रांमध्ये ही माहिती उघड आहे,” असेही राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here