Home बीड धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या कामात माती मिश्रीत वाळूचा वापर!

धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या कामात माती मिश्रीत वाळूचा वापर!

153
0

किल्ले धारूर – धारूर येथील भुईकोट किल्ल्यातील तीन भिंती पावसाळयात पडल्या या पडलेल्या भिंतींचे काम करण्यास सुरुवात झाली आहे परंतु या कामात सरास माती मिश्रीत वाळूचा वापर होताना दिसत यामुळे धारूरचे वैभव असलेल्या किल्ल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे या गंभीर बाबीकडे पुरातत्व भागाचे दुर्लक्ष झाले आहे.
 धारूर येथील किल्ल्याचे काम २०१७ मध्ये सुरू करण्यात आले होते काही महिन्यातच किल्ल्याच्या भिंती ढासळल्या सुमारे सात कोटी रुपये खर्चून हे काम पूर्ण करण्यात आले होते काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने भिंती फुगून पडल्या गुत्तेदारावर पुन्हा काम करण्याची नामुष्की ओढवली 
आता सुरू असलेल्या कामावर पत्रकार तसेच नागरिकांनी भेट दिली असता या ठिकाणी माती मिश्रीत वाळूचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे यामुळे पुन्हा एकदा किल्ल्याच्या कामात बोगस गिरी होत असल्याचे समोर आले आहे गुत्तेदार तसेच संबधित विभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या राखत आहेत अधिकारी बोगसगिरी करून लोक प्रतिनिधी यांना चुकीची माहिती देत आहेत त्यामुळे धारूरचा ऐतिहासिक वारसा धारूर करांचे वैभव  महादुर्ग किल्ला धोक्यात आला आहे या किल्ल्याचे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे.

इतिहास प्रेमींनी लक्ष देण्याची गरज
येथील किल्ल्याच्या कामा बाबतीत इतिहास प्रेमींनी लक्ष देण्याची गरज आहे पूर्वी झालेले काम दर्जेदार न झाल्याने इतिहास प्रेमी गड प्रेमी नागरिक मध्ये नाराजी पसरली होती आता परत ते काम दर्जेदार करून घेण्याची संधी मिळाली आहे सर्व इतिहास प्रेमींनी लक्ष देवून काम दर्जेदार करून घ्यावे लागेल.

धारूरकरांना मिळू शकतो रोजगार
धारूर येथील किल्ल्याचे काम दर्जेदार होवून हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास येथील तरुणांना यातून रोजगार मिळू शकतो यासाठी या क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी काम दर्जेदार करून घेण्याकडे लक्ष द्यायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here