Home देश-विदेश US Elections 2020 : 225 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वयोवृद्ध उमेदवारांमध्ये अमेरिकेत...

US Elections 2020 : 225 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वयोवृद्ध उमेदवारांमध्ये अमेरिकेत होतेय निवडणूक लढत

34
0

वॉशिंग्टन : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 24 कोटी अमेरिकन नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील.अमेरिकेच्या आतापर्यंतच्या 225 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वयोवृद्ध उमेदवारांमध्ये निवडणूक होत आहे. व्हाईट हाऊसवर दुसऱ्यांदा कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले डोनाल्ड ट्रम्प 74 वर्षांचे आहेत आणि त्यांचे विरोधक ज्यो बायडेन हे 77 वर्षाचे आहेत.त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. अमेरिकन वेळेनुसार सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता अमेरिकेत मतदानाला सुरुवात होईल.

24 कोटी मतदार करणार मतदान :
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जवळपास 9.2 कोटी मतदारांनी आधीच त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. अमेरिकन माध्यमांच्या रिपोर्टनुसार अमेरिकेत एकूण लोकसंख्येच्या 25.7 कोटी मतदार हे 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. त्यामध्ये जवळपास 24 कोटी मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील.

भारतीय-अमेरिकन मतदारांची महत्वाची भूमिका
अमेरिकेच्या निवडणूकीत भारतीय वंशाच्या मतदारारांची संख्या ही मोठी आहे आणि ते या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून आपण भारताचे जवळचे मित्र असल्याचे भासवले जात आहे. पारंपरिकदृष्ट्या भारतीय वंशाच्या मतदारांचा डेमोक्रॅटिक पक्षाकडे कल असतो, पण यावेळी दोन्ही पक्षांनी या मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय वंशाच्या मतदारांचा कल अद्याप स्पष्ट झाला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या मूळच्या भारतीय वंशाच्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here