Marathwada Sathi

परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सिव्हील सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. 23 ऑक्टोबर 2020 रोजीच या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. यूपीएससीने परीक्षेनंतर केवळ 19 दिवसात निकालाची घोषणा केली. upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
उत्तीण विद्यार्थ्यांना आता यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी विस्तृत फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वर 28 ऑक्टोबर 2020 ते 11 नोव्हेंबर 2020 च्या सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत भरता येईल. त्यांची मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होईल. यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी अॅडमिट कार्ड आणि परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी 3-4 आठवडे येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version