Marathwada Sathi

कोरोनामुक्त झाल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील बऱ्याच राज्यात सणाच्या हंगामामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. सर्वसामान्य व्यक्ती ते सेलिब्रेटी, नेते, खेळाडू, उद्योजक असे अनेकजण या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत.यातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं टेस्ट करून घेण्याचं आवाहन देखील इराणी यांनी केले होते. बिहारमध्ये प्रचारसभांमध्ये इराणी स्टार प्रचारक म्हणून सक्रिय होत्या.

गेल्या महिन्याच्या २८ तारखेला स्मृती इराणी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर नवी दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराअंती आज अखेर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त झाल्या आहेत. ट्विट करुन आपण कोरोनामुक्त झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच सदिच्छा व्यक्त करणाऱ्या शुभचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Exit mobile version