Home अहमदनगर छोट्या छोट्या वृत्तपत्रातून नवीन विषय समजतात : डॉ. राजेंद्र भोसले

छोट्या छोट्या वृत्तपत्रातून नवीन विषय समजतात : डॉ. राजेंद्र भोसले

10063
0

मराठवाडा साथी न्यूज
अहमदनगर – छोटी छोटी वृत्तपत्रे हे काहीतरी नवीन विषय घेऊन लिखाण करत असतात , त्यामध्ये नाविन्य असते म्हणून मी त्यांचे आवर्जून वाचन करतो , मला ते आवडतात असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.


दैनिक मराठवाडा साथीचे अहमदनगर आवृत्ती प्रमुख बाजीराव खांदवे यांनी नुकतीच त्यांची कार्यालयात भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते.
लहान वृत्तपत्रे ही नवीन वेगवेगळे विषय शोधून काढत असतात व त्यावर चर्चा करून आपल्या समस्या कडे लक्ष वेधून घेतात, अशा प्रकारच्या समस्या जाणून घेण्यामध्ये मला नेहमीच रस असतो, व असे प्रश्न फक्त छोट्या वृत्तपत्रांमध्येच आढळतात.
यावेळी त्यांनी आजची शिक्षण पद्धती व जुनी पौराणिक शिक्षण पद्धती यामध्ये तुलनात्मक चर्चा करून भारताची पौराणिक अभ्यास पद्धती जगामध्ये अशी श्रेष्ठ होती, व इंग्रजांनी त्याला कसे पद्धतशीर संपवले हे यावेळी समजावून सांगितले.
यावेळी निवासी केंद्रीय शाळेमध्ये शिक्षण घेतलेले सेंट्रल बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, राजेंद्र थोरात सर, राज्याच्या निवासी शाळेत शिक्षण घेतलेले नगरचे प्रसिद्ध व्यावसायिक रमेश खिलारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी कार्तिकस्वामी इंगळे, शहरातील प्रसिद्ध सिव्हिल इंजिनिअर मधुकर बालटे आदी उपस्थित होते.
हे सर्व मान्यवर सातारा सैनिक स्कूल व शासकीय विद्या निकेतनचे माजी विद्यार्थी होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here