Marathwada Sathi

पोलिसांचा दुरुपयोग करत राज्य सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप

मराठवाडा साथी न्यूज

मुंबईः अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सकाळी अटक केली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी या प्रकरणी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

मुंबई: रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपने महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांचा दुरुपयोग करुन महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी लावल्याचा आरोप भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यात रिपल्बिक टीव्हीने कोरोनाबाबत राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची पोलखोल केली. त्यामुळेच राज्य सरकार पोलिसांच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राम कदम यांनी केला आहे.

“गेल्या काही दिवसात ज्या प्रकारे अर्णव गोस्वामी आणि त्यांचं चॅनेल रिपब्लिक टीव्ही ने महाराष्ट्र सरकारच्या अनेक गोष्टींवर हल्ला चढवला होता, तो पालघर हत्यांकांड असो किंवा सुशांत सिंह राजपूत आत्यहत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा हस्तक्षेप असेल.  या सर्व गोष्टी देशापासून आणि जनतेपासून लपलेल्या नाहीत, कुठेतरी बदला आणि सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारने पोलिसांचा दुरुपयोग करत केलेलं अतिशय निंदनीय कृत्य आहे. सरकारला अशाप्रकारे पोलीस बळाचा वापर करता येणार नाही, कोरोनाशी दोन हात करताना आलेलं अपयश आणि सर्वच विषयांत सरकारला आलेलं अपयश ते रिपब्लिकच्या पत्रकारांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला, दिखावेगिरी करत सरकारने अशा प्रकार खोटंनाटं करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी”, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी अर्णव गोस्वामीच्या अटकेनंतर दिली आहे.

Exit mobile version