Home बीड असह्य रोगाने मोकाट कुत्र्यांना पछाडले!

असह्य रोगाने मोकाट कुत्र्यांना पछाडले!

211
0

बीड
सन २०२० हे वर्ष रोगाचे वर्ष म्हणून घोषित झाल्यास वावगे ठरणार नाही. माणसाला कोरोना ने, पाळीव दुभत्या जनावरांना लंपी आजाराने तर आता मोकाट कुत्र्यांना देखील असह्य रोगाने पछाडले असल्याने या रोगाचा असह्य त्रास या मुक्या जनावरांना भोगावे लागत आहे.
मार्च २०२० पूर्वीपासूनच संपूर्ण जगात कोरोना नावाच्या महामारीने भयानक रूप घेऊन संपूर्ण मानव जातीला आपल्या बाहुपाशात कवटाळले. जगातील मानवजातीचे जीवन केवळ या मायक्रो व्हायरसने नेस्तनाबूत केले. माणसाला वाचा आणि बुद्धी असल्याने या आजारातून अनेक जण मुक्त झाले. त्याचबरोबर जगातील लाखो नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकून मृत्युमुखी पडले. अनेकांचे कुटुंब संपले तर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबावर कशी वेळ येते? याचा प्रत्यय ज्याची त्यालाच येत असतो. आम्हाला कोणाची काय भीती? असे म्हणून वावरणाऱ्या लोकांना शासनाने कितीही सांगितले तरी काही फरक पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांनी ज्यांनी कोरोनाशी दोन हात केले. त्यांच्या कुटुंबातील काही लोक मृत्युमुखी पडले अशा लोकांना प्रत्यक्षात भेटल्यास कोरोना महामार्गाचे रौद्ररूप नक्कीच त्यांच्या लक्षात येईल.
मानवजातीला कोरोना नावाच्या महामारीने ग्रासले असतानाच याच काळात वृक्षवेलींनाही विविध रोग पडल्याने त्यांची पाने गळती आणि वयोवृद्धी खुंटल्याने शेतकरी आणि फळबागा सांभाळणाऱ्या वर मोठे संकट आले होते. त्याचप्रमाणे पाळीव दुभत्या जनावरांना लंपी नावाच्या आजाराने ग्रासले. यातून कसेतरी ही जनावरे मुक्त झाल्यानंतर आता मोकाट कुत्र्यांना असह्य रोगाने ग्रासले असून जिवाचे अकांडतांडव होताना देखील या मुक्या जनावरांना कोणाला काहीच सांगता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या वागण्यावरून त्यांना असह्य वेदना होत असल्याचे दिसत असले तरी त्यांच्या या वेदना जाणून घेणारे आणि त्यांना या वेदनेतून मुक्त करणारे हात पुढे येत नसल्याचे दिसत आहे.
राज्यातील पशुवैद्यकीय विभागाने या मोकाट कुत्र्यांना जडलेल्या रोगापासून मुक्ती देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकंदरीतच सन २०२० हे वर्ष चल, जलचर आणि अचर या सर्वच जीवांना विघातक ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here