Marathwada Sathi

शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराची संयुक्त राष्ट्राकडून दखल…!

मराठवाडा साथी न्यूज
दिल्ली:
शेतकरी आंदोलनात हिंसाचाराची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी भारत सरकारने शांततेत आंदोलन करून देण्याच्या स्वातंत्र्याचे आणि अहिंसेचे सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. याआधीदेखील संयुक्त राष्ट्र संघाने लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते.दिल्लीत झालेल्या हिंसक घटनेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघ महासचिवांच्या प्रवक्त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, भारताच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना शांततेत आंदोलन करू दिले पाहिजे. आंदोलन करण्याच्या अधिकाराचा सन्मान झाले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
मागील जवळपास ६० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमेकडे कूच करताना आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न झाले होते. यामध्ये रस्त्यांमध्ये अडथळे उभारण्यात आले होते. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली होती. या आंदोलनाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले होते. कॅनडाने या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, भारताने कॅनडासह इतर बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून ८६ पोलीस जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर रॅलीसाठी नियोजित मार्गावरून न जाता दुसऱ्या मार्गानं लाल किल्ल्यापर्यंत पोहचणाऱ्या आंदोलनकर्त्यांना किल्ल्यातून बाहेर काढण्यात आलंय. तसंच संपूर्ण किल्ल्यात मोठ्या संख्येनं सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Exit mobile version