Marathwada Sathi

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका सुरू असतानाच उमेश यादवच्या वडिलांचे निधन

नागपूर, : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वडिलांचे निधन झाले. उमेश यादवचे वडील तिलक यादव यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ :३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मलावली .गेल्या काही महिन्यांपासून उमेश यादवचे वडील आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचास सुरू होते. औषध उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने अखेर डॉक्टरांनी उमेश यादवशी चर्चा केली होती. त्यानंतर उमेशने त्याच्या वडिलांना नागपूरमधील घरी आणले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यादवचे वडील तिलक यादव हे वलनी कोळसा खाणीत काम करायचे. कुस्तीची आवड असलेले तिलक यादव हे उत्तर प्रदेशातल्या पडरौना इथून नोकरीच्या निमित्ताने नागपूरमध्ये आले होते. कोळसा खाणीत काम मिळाल्यानंतर त्यांनी नागपूरमध्येच वास्तव्य केले.
तिलक यादव यांना उमेशने पोलिसात नोकरी करावी अशी इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर उमेश यादवने लष्करासह पोलिसात भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नव्हते. टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या उमेशला रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर भारतीय संघातही त्यानं पदार्पण केलं. विदर्भाकडून कसोटी खेळणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला.

Exit mobile version