Home महाराष्ट्र गो म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता – हेच का तुमचं हिंदुत्व?

गो म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता – हेच का तुमचं हिंदुत्व?

5
0


मुख्यमंत्री ठाकरेंनी साधला भाजपवर निशाणा
मराठवाडा साथी

मंदिरात घंटा बडवणार हिंदुत्व नाही तर अतिरेक्यांना बडवणार हिंदुत्व मला हवयं असे म्हणत .मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.सेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. गोहत्याबंदी कायदा करून तुम्ही हिंदुत्त्व जपता . आमच्या महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू केला तर मग गोव्यात हा कायदा का लागू नाही केला . गो म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता अश्या शब्दात त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. मंदिरे उघडण्यावरून आणि हिंदुत्वावरून भाजपाकडून निरंतर सेनेवर निशाणा साधला जात आहे. त्याचाच समाचार मुख्यमंत्री ठाकरेंनी दसरा मेळाव्यात घेतला. वाघाला जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर वाघ काय शेपूट हलवणारं मांजर नाहीये ते फटका मरणारच. ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळी आज हिंदुत्त्व विचारणारेच बिळात जाऊन लपले होते. ” हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. “असा पलटवार करत त्यांनी सेनेचे हिंदुत्व दाखवून दिले.

आता मुख्यमंत्री ठाकरेंच्या या भाषणावरून भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. .
” शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे ,केवळ गडबड गोधळलेल्या पक्षप्रमुखांच्या भाषणाचा उत्तम नमुना आहे., त्यात ना धड हिंदुत्त्व होते , न विकास होता , न धर्मनिरपेक्षता होती” अस पलटवार भाजप आमदार अतुल भाटखळकर यांनी केला आहे.


रेल्वे सुरु पण प्रवाश्यांकडून संमिश्र प्रतिसाद – मराठवाडा साठी टीव्ही रिपोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here