दर्पण दिनानिमित्त दरवर्षी “रिपोर्टर ऑफ द इअर” हा पुरस्कार कराड हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येतो. 2021 वर्षाचा हा बहुमान मला आज देण्यात आला. खरे तर डॉ.बालासाहेब कराड सर आणि डॉ.शालिनीताई कराड यांचा मनाचा हा मोठेपणा आहे. समाजाच्या हिताच्या विषयांना न्याय देणे ही लेखणीची जबाबदारीच आहे. मागील काळात मला जे विषय हाताळता आले आहेत किंवा ते मी ऐरणीवर आणले ते केवळ आपल्यावर असलेल्या जाबाबदारीतूनच…. कोरोनासारख्या महामारीच्या काळात ताई आणि सरांनी केलेले काम हेच एका योध्याप्रमाणे आहे. आम्हालाही सतत आधार आणि प्रेरणा देण्याचे काम या दाम्पत्याकडून नेहमीच होत असते. चांगल्या लिखाणाचे नेहमीच त्यांच्याकडून कौतुक होते, कोणत्याही विषयावर ते दोघेही नेहमीच आवर्जून चर्चा करतात… चुकेल तिथे कान टोचतात आणि चांगले असेल तर कौतुकही करतात. अनेक पुरस्कार मला याअगोदर मिळाले, परंतु आजचा पुरस्कार हा माझ्यासाठी कौटुंबिक स्नेहाचा आणि प्रेरणादायी आहे. ताई आणि सरांचा मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे. त्याच बरोबर माझ्या कामात मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या सर्वांचाही मी आभारी आहे. हा पुरस्कार मला आगामी काळात अधिक चांगले लिहिण्यासाठी आणि काम करण्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे.
-दत्तात्रय काळे
वृत्तसंपादक – दै.मराठवाडा साथी
परळी वैजनाथ