परळी
परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता नवनाथ शिंदे यांची बदली नाशिक औष्णिक विद्युत केँद्र येथे करण्यात आली असुन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे प्रभारी मुख्य अभियंता म्हणुन नाशिकचे मोहन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीच पञ कार्यकारी संचालक यांनी काढले आहे.
जवळपास एक महिण्या पासुन नवनाथ शिंदे हे रजेवर गेल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राला मुख्य अभियंता विनाच कारभार चालु होता.कार्यकारी संचालक यांनी दि.31 डिसेंबर रोजी एका पञाद्वारे आदेशीत केले आहे कि,परळी औष्णिक विद्युत केंद्राचे अभियंता नवनाथ शिंदे यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.नवनाथ शिंदे यांची बदली नाशिक येथे तर परळी औष्णिक विद्युत केँद्राच्या प्रभारी मुख्य अभियंता म्हणुन नाशिकचे मोहन आव्हाड यांची नियुक्ती केली आहे.