Marathwada Sathi

गंगाखेड नवामोंढ्यातील व्यापाऱ्याचा गोदामावर धाडी,रेशनचा ३५ टन तांदूळ जप्त,धान्य माफिया रेशन दुकानदार हादरले

गंगाखेड
कोरोना कोव्हिड काळातील सर्वसामान्य जनतेला मोफत वाटपासाठी आलेल्या रेशन धान्याचा काळाबाजार करण्यासाठी शहरातील मोंढ्यातील दोन गोदामात साठविलेल्या धान्यावर परभणी पोलिस विशेष पथकाने धाड टाकून ३५ टन तांदूळ जप्त करीत दोघाना अटक करण्यात आल्याने सदरील व्यापाऱ्याना रेशनचे धान्य पुरवठा करणाऱ्या धान्य माफिया रेशन दुकानदाराचे धाबे दणानले आहे.

कोरोना कोव्हिडचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लाँकडाऊन करीत सर्वसामान्य जनतेसाठी रेशनचा माध्यमातुन रेशनकार्ड धारकासह परराज्यातील मजुराना प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदुळ वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते.गंगाखेड शहर सह तालुक्यात १६३ रेशन दुकानदारानी मोफत वाटप तांदळावर मोठ्या प्रमाणात डल्ला मारत रेशन कार्ड धारकाना देण्यात येणाऱ्या पाच किलो ऐवजी तीन किलोच वाटप करून मापात पाप केले तर रेशन कार्ड धारक शासकीय नोकरदार प्रतिष्ठित व्यापारी नागरिक यांचाही धान्यावर डल्ला मारला याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी तहसिल प्रशासनाचा पुरवठा विभागाकडे आजही धुळखात पडलेल्या आसून पुरवठाधिकारी यांनी रेशन दुकानदार यांचीच पाठराखण केल्याने सातत्याने रेशन धान्याचा काळा बाजार ही नित्याची बाब बनली आहे. गंगाखेड शहरातील मोंढा भागात मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ आला असून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी दिला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक दडस फौजदार विश्वास खोले,पोलीस कर्मचारि सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ,यशवंत वाघमारे, राहूल चिंचाने, शंकर गायकवाड़,अजहर पटेल, विष्णु भिसे, दिपक मुदिराज आदींच्या पथकाने रविवारी मिळालेल्या माहितीची खातरजमा करत मोंढा परिसरातील दोन गोदामात बेकायदेशीर ठेवलेला रेशनचा तांदूळ पथकाने दोन व्यापाऱ्याचा गोदामावर धाडी टाकून ६ लाख १२ हजार ५०० रुपये किंमतीचा ३५ टन तांदूळ जप्त केला. तेथील पोत्यांची तपासणी केली त्यावेळी त्यात रेशनचा तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले.सर्व पोत्यांची पाहणी करित मोजदाद केली त्यावेळी तब्बल तो ३५ टन रेशनचा तांदूळ असल्याचे निदर्शनास आले.पथकाने तेथील एक वाहन जप्त केले.ज्यात तांदळाची ने-आण करण्यासाठी वापरले जात होते. यावेळी पथकाने तेथील दोघांना ताब्यात घेतले याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून ६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ३५ टन रेशनचा तांदूळ,३ लाख ५० हजार रुपयांचे वाहन असा एकूण ९ लाख६३ हजार५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येउन दोघाना ताब्यात घेतल्याने कार्यवाहीचा भितीने धान्य माफिया रेशन दुकानदार यांचे धाबे दणानले आहे.

Exit mobile version