Home देश-विदेश ‘टॉम अँड जेरी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘टॉम अँड जेरी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

417
0

मराठवाडा साथी न्यूज

लहानांपासून मोठ्यापर्यंत ‘टॉम अँड जेरी’ पाहायला सर्वांनाच आवडत. गेली अनेक वर्षे या कार्टुनने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळीच जागा निर्माण केल्याचे दिसून येते. पुन्हा एकदा टॉम अँड जेरी एकमेकांच्या मागे धावताना,एकमेकांशी भांडतांना बघायला मिळणार आहेत. ‘वार्नर ब्रेस’ यांनी नुकताच टॉम अँड जेरीचा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलर रिलीज करताना वार्नर म्हणाले, टॉम आणि जेरी इतक्या लवकर लोकांचा पाठलाग सोडणार नाहीत.

वॉर्नर ब्रदर्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट पूर्णपणे अ‍ॅनिमेटेड नाही. यामध्ये केवळ टॉम, जेरी आणि काही प्राण्यांसाठी अ‍ॅनिमेशनचा वापर करण्यात आला आहे. तसेच ट्रेलरदेखील मूळ चित्रपटासारखेच आहे.चित्रपटातील टॉम आणि जेरी चे भांडणं अगदी वास्तविक ठेवली आहेत. हॉटेलमध्ये एक मोठा व्हीआयपी विवाह होणार आहे परंतु तेथील कर्मचारी जेरीमुळे नाराज आहेत. जेरीला पकडण्यासाठी टॉमला घेतले आणि त्यानंतर त्यांच्यातील मजेदार भांडण सुरू होते. आतापर्यंत लाखो व्हुज आणि लाईक्स ट्रेलरला आलेले आहेत. २०२१ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here