Home बीड शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक पौंडूळ येथे बांधावर...

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक पौंडूळ येथे बांधावर आंदोलन

615
0

बीड
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा म्हणून सोमवारी (दि.२८) पौंडूळ (ता.शिरुर) येथे ऊसाच्या फडात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
दिल्लीत दोन आठवड्यांपासून राज्यभरातील शेतकरी एकवटले आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाला विरोध करत सुुरु असलेल्या या आंदोलनाला ठिकठिकाणाहून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पौंडूळ (ता.शिरुर) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर निदर्शने करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे जाचक कायदे आणले आहेत. ते मागे घ्यावेत व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी यावेळी कमल निंबाळकर यांनी केली. केंद्र सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित असून ते कदापिही सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शेतकरी, ऊसतोड मजूर आदी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here