उत्तर प्रदेश : बहीण भावाच्या विलक्षण नात्याला काळिमा फासवणारी घटना उत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये घडली आहे. वयाने लहान असलेल्या विवाहित बहिणीवर मोठ्या भावानं बलात्कार केल्याची घटना मोरादाबादमध्ये घडली आहे. एवढेच नाही तर या विकृतीने याचा व्हिडीओ तयार करून वाच्यता केल्यास व्हायरल करण्याची धमकीही दिली. सतत छळ होत असल्यानं पीडितेने पोलिसांत धाव घेतली. ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार . पीडित महिलेचा पती बाहेर असताना मोठा भाऊ तिच्या घरी आला. त्यावेळी तो मद्याधुंद अवस्थेत होता. यावेळी त्याच्यासोबत मद्यपान केलेला मित्रही होता. बहीण एकटी असल्याचं बघून भावाने तिच्यावर बलात्कार केला. तर त्याच्या मित्राने व्हिडीओ शूट केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराची कुणाकडे वाच्यता केल्यास व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली.या घटनेनंतर भावाचं हीन कृत्य थांबलं नाही. त्यानंतर तो पीडितेवर लक्ष ठेवायचा तसेच छळही करायचा. तर दुसरीकडे पीडितेचे आईवडिलही तिच्या पोलिसात न जाण्यासाठी दबाव आणू लागले. त्यामुळे पीडितेचा संयम सुटला आणि तिने पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. महिलेने तक्रार दिल्यानंतर मोरादाबाद पोलिसांनी सोमवारी पीडितेचा भाऊ व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.“ही घटना घडल्यानंतर आपण पतीला सांगितलं. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पण, कुटंबीयांनी सामाजातील प्रतिष्ठा खराब होईल, असं सांगत तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, आरोपी भाऊ घराच्या परिसरातच फिरायला लागला. तसेच छळ करू लागला आणि धमकी देऊ लागला. त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार केली,” असं महिलेनं फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी सध्या फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल,” असे सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे प्रमुख दर्वेश कुमार यांनी सांगतिले .