Marathwada Sathi

तिकीट तपासणीकांना मारहाण…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : तिकीट निरीक्षकाला मारहाण करण्याची धक्कादायक घटना फ्लाईंग राणी या एक्स्प्रेसमध्ये घडली आहे.मुदत संपलेल्या पासने रेल्वेप्रवास करणाऱ्या तरुणांना पकडल्यामुळे तिकीट निरीक्षकाला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी आरोपी चिन्मय बारी आणि धीरेंद्र पाटील या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केळवे रोड स्थानक परिसरात तिकीट तपासणीसांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे तिकीट-पासची मागणी केली. त्यांच्याकडे एक महिन्याचा मुदत संपलेला पास होता.तिकीट तपासणीसांनी दंड भरण्यास सांगताच त्यांनी वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली.दरम्यान,या तरुणांकडे रहेजा रुग्णालयाचे ओळखपत्र सापडले आहे.या ओळखपत्राची सत्यता तपासण्यात येत आहे,असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version