Marathwada Sathi

लव्ह औरंगाबाद नावाच्या फलकांवर दगड फेक

छत्रपती संभाजीनगर : शहरात रविवारी हिंदू जन गर्जना मोर्चा संपल्यानंतर घरी जाताना मोर्चेकऱ्यांनी औरंगपुरा ते निराला बाजार मार्गावर फलकांवर ‘औरंगाबाद’ अस तिथे दिसेल त्या फलकावर दगडफेक केली.महापालिका शौचालयावरील ‘औरंगाबाद’ उल्लेखाच्या फलकावर चिखल फासला. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील कोनशिलेवर खासदार इम्तियाज जलील यांचा उल्लेख होता. त्यांच्या नावावर शाई फासली. यानंतर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त लावला.छत्रपती संभाजीनगर नामांतराला समर्थनासह अन्य मागण्यांसाठी आज सकाळी क्रांती चौक ते अदालत रोड मार्गे औरंगपुरा असा विराट ‘हिंदू जन गर्जना मोर्चा’ निघाला. मोर्चाच्या सांगतेवेळी हैदराबाद येथील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी आक्रमक भाषण केले. याठिकाणी हजारो तरुण आले होते. भाषण सुरू असतानाच शिवसेना भवनावरून काही तरुणांनी दगडफेक केली. भाषण संपल्यानंतर परतताना यापैकी काहींनी ‘औरंगाबाद’ उल्लेख दिसेल त्या फलकांची नासधूस केली.औरंगपुरा येथील सभेच्या ठिकाणाहून ५० मीटरवर महापालिकेचे सुलभ शौचालय आहे. त्याच्या फलकावरील ‘औरंगाबाद’ उल्लेखाला चिखल फासला. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या बसथांब्यावरील ‘औरंगाबाद’ उल्लेखाचा फलक फोडला. त्यापुढील बसथांब्यावरील बस वेळापत्रकाचा फलक काढून चिखलात टाकण्यात आले. ॲक्सिस बँकेच्या शाखेवर ‘औरंगाबाद’ असा उल्लेख दिसल्याने त्याठिकाणी मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली. दुकानांबाहेरील ‘औरंगाबाद’ उल्लेखाचे पोस्टरही फाडण्यात आले. दगडफेकीतील दोघांना पोलिसांनी धरून ठेवले होते.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती अनुराधा चव्हाण यांनी सिडको चौक ते हर्सूल रस्त्यावरील एसबीआय चौकातील पिरॅमिडजवळील ‘आय लव औरंगाबाद’चा डिजिटल फलक फोडला. मोर्चा निघाल्यानंतर औरंगपुरा, निराला बाजार, सिल्लेखाना चौक, पैठणगेट, क्रांती चौक, एसबीआय चौक आदी ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त होता.जलील यांचे नाव खोडण्याचा प्रयत्नक्रांती चौकात वर्षभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. चौथऱ्याशेजारी असलेल्या कोनशिलेवर खासदार इम्तियाज जलील यांचे नाव होते. मोर्चाच्या दरम्यान, काही उपस्थितांनी जलील यांच्या नावावर पेनातील शाई फासत नाव खोडण्याचा प्रयत्न केला. मोर्चा संपल्यानंतरही क्रांती चौकात पोलिस बदूबस्त वाढण्यात आला होता .

Exit mobile version