Marathwada Sathi

शेतकऱ्यांच्या धमकीने ; भाजपच्या वरिष्ठांची तातडीची बैठक…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या बॉर्डरवर पाय गाडून बसलेले शेतकरी आरपारच्या मूडमध्ये आहेत. केंद्र सरकार नवीन कृषी कायदा रद्द करीत नाही तोपर्यंत माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरयाणातील लाखो शेतकरी बॉर्डरवर जमले आहे.महत्वाचे म्हणजे, सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर दिल्लीची चौफेर कोंडी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर, चर्चा करण्याचा शहा यांचा प्रस्ताव सुध्दा त्यांनी धुडकावून लावला. शेतकऱ्यांनी सर्व बॉर्डरवर आंदोलन केले तर कुणालाही येता जाता येणार नाही.

यामुळे भाजपच्या वरिष्ठांची तातडीने बैठक बसविण्यात आली.बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याशी दीर्घ चर्चा केली. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

Exit mobile version