Home देश-विदेश जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हजारो सुरक्षारक्षक तैनात…!

जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हजारो सुरक्षारक्षक तैनात…!

113
0

मराठवाडा साथी न्यूज

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे उद्या (२० जाने.)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. त्यांच्या बरोबरच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस हे देखील शपथ घेणार आहेत.या शपथविधी समारंभाकरीता समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ३५ हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

अमेरिकेतील वेळेनुसार, शपथविधी सकाळी सुमारे १० वाजता सुरु होणार असून जो बायडन कोरोनाविरोधातील लढा, अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासोबतच राष्ट्राची एकता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या योजनांवर प्रकाश टाकतील.

दरम्यान,कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार असून या शपथविधी समारंभासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनुपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here