Home मनोरंजन लॉकडाऊननंतर ‘डार्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊननंतर ‘डार्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला

349
0

मुंबई : कोरोना काळात चित्रपट प्रेमींना एकही नवीन मराठी किंवाअन्य भाषिक चित्रपट बघायला मिळाला नाही. मात्र, आता मराठी सिनेरसिकांकरिता आनंदाची बातमी आली आहे. लवकरच काहीतरी मजेदार बघायला मिळणार आहे. ‘टाईमपास’ फेम प्रथमेश परब आपल्या चाहत्यांसाठी पुन्हा भेटायला येत आहे. लवकरच त्याच्या ‘डार्लिंग’ नावाच्या चित्रपटामार्फत तो सर्वांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे.
लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या चित्रपट गृहे राज्यसरकारने आता खुली केली आहेत. टीटमुळे आता सर्वच फिल्म मेकर्स आपआपले चित्रपट प्रदर्शित करण्याकरिता तारखा ठरवू लागले आहेत. असे असतांनाच समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘डार्लिग’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. या सिनेमाची आपल्या प्रदर्शनाची तारीख ठरवली असून नवीन वर्षातल्या पहिल्या शुक्रवारी म्हणजेच ७ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात प्रथमेश परबची मुख्य भूमिका असून, त्याचा लूकही आता लॉंच करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here