Home मनोरंजन हृतिक रोशनचा हा व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

हृतिक रोशनचा हा व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

76
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या स्टाइलला फॉलो करणारेही अनेक आहेत. त्याच्या फिटनेसचेही अनेक जण चाहते आहेत. त्याचा फिटनेस चित्रपटातील अनेक ॲक्शन सीनमधून दिसला आहे. चित्रपटातील त्याच्या ॲक्शनची चर्चा नेहमीच होत असते. चाहत्यांसाठी तो आपले व्हिडीओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. सध्या त्याचा एक ॲक्शन व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्याच ‘अग्निपथ’ या चित्रपटातील गाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यावर स्वतः हृतिकनेही कमेंट दिली आहे.

एका चाहत्याने हृतिकच्या अनेक चित्रपटांतील क्लिप जोडून हा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ इतका वायरल झाला आहे की हृतिकने त्याला ‘छान’ म्हणत स्वतः आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून तो शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here