Marathwada Sathi

“. . . . . . या सीनमुळे होतोय ” नेटफ्लिक्स बॉयकॉट हॅशटॅग ट्रेंड “

“अ सुटेबल बॉय” सीरीजमधल्या एका सीनमुळे होतोय ट्विटरवर वाद

ट्विटरवर सध्या बॉयकॉट ट्विटर हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. याला कारण, नेटफ्लिक्सवरची “अ सुटेबल बॉय” सीरीज कारणीभूत ठरली आहे. खरंतर तीन महिन्यांपूर्वीच ही सीरीज इंग्रजीमध्ये आली होती. त्यावेळी काही वाद झाला नाही. पण आता ही सीरीज हिंदी भाषेत आल्यानंतर मात्र या वेब सीरीजवरून वाद निर्माण झाले आहेत.

अ सुटेबल बॉय या मालिकेत एक मुस्लीम मुलगा एका हिंदू मुलीचं चुंबन घेतानाचं दृश्य आहे. हा सगळा सीन एका मंदिराच्या आवाराता घडतो. त्यामुळे ट्विटरवर काहींच्या भावना दुखावल्या आहेत.या वेबसीरीजमधला दाखवण्यात आलेला सीन हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही अस अनेकांचं म्हणणं आहे. क्रिएटीव्ह फ्रिडम याला म्हणतात असं सांगत अनेकांनी बॉयकॉट नेटफ्लिक्सचा नारा दिला आहे. यातल्या एकाने तर या सीनबद्दल थेट केस करण्याचीच भाषा सुरू केली आहे. हा हॅशटॅग ट्रेंड करताना यावरचे काही मीम्सही तयार झाले आहेत. यात मुस्लीम मुलगा हिंदू मुलीचं चुंबन घेतो याला अनेकांचा आक्षेप नाहीय. तर हा सीन चित्रित होणारी जागा ही हिंदू मंदिर आहे. अशा ठिकाणी अशा गोष्टी करण्याची आपली संस्कृती नाही असं यांचं म्हणणं आहे.

Exit mobile version