मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : ब्रिस्बेन कसोटी सामन्याा अगोदरच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.कारण टीम इंडियाचा स्टार गोलंदाज असणारा जसप्रीत बुमराह १५ जाने. पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या कसोटी सामन्यात खेळणार नाही.मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराह शेवटच्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचा दावा बीसीसीआयच्या सुत्रांनी केला आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,जसप्रीत बुमराह हे पोटाच्या समस्येने त्रस्त आहे.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थिती टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूला संधी मिळणार,यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.याव्यतिरिक्त टी नटराजन किंवा कार्तिक त्यागी चौथ्या कसोटीत डेब्यू करण्याची शक्यता आहे.
दरम्यान,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंच्या फिटनेस संदर्भातील समस्या वाढत चालल्या आहेत.सिडनीतील ड्रॉ केलेल्या तिसर्या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही.