Marathwada Sathi

प्रत्येक मालिकेनंतर ‘किट बॅग’ दान करतो हा खेळाडू…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : नुकतीच एका खेळाडूच्या दानशूर पणाबद्दल खुलासा झाला असून हा खेळाडू चक्क प्रत्येक मालिकेनंतर त्याची ‘किट बॅग’ दान करून टाकतो.भारतीय क्रिकेट संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खऱ्या अर्थाने आपली वेगळी ओळख तयार करत क्रीडारसिकांच्या मनाचा ठाव घेणारा खेळाडू ऋषभ पंत याच्या दानशूर पणाची एका मुलाखती दरम्यान नुकतीच प्रचिती झाली आहे.

ऋषभने एका मुलाखतीत सांगितले की,प्रत्येक मालिकेनंतर तो त्याची क्रिकेट किट बॅग गरजू आणि युवा खेळाडूंना दान करतो.बीसीसीआयशी करारबद्ध झाल्यापासून तो असे करु लागला आहे.याचबाबत सांगताना त्याने उलगडा केला होता की, तारक सर त्याला फलंदाजी आणि यष्टीरक्षणासाठीचे सामान द्यायचे. बूट आणि बॅटही द्यायचे.आशिष नेहराही क्लबमध्ये बरेच सामान देत होते, ज्यामुळे ऋषभ आणि इतरही खेळाडूंना मदत मिळत होती.कारकिर्दीच्या अगदीच सुरुवातीच्या टप्प्यावर असताना त्याला अनेकांनीच मदत केली होती, सामान दिले होते.अशा परिस्थितीत आता जेव्हा आपण इतरांना मदत करु शकू या स्थानी पोहोचलो आहोत तर मग यात हात आवरता का घ्यावा,अशाच वृत्तीने तो प्रत्येक मालिकेनंतर क्रिकेट किट दान करतो.

https://www.instagram.com/p/CKOsebEjSGh/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version