Marathwada Sathi

हॉलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री पाचव्यांदा अडकली लग्नाच्या बेडीत…!

मराठवाडा साथी न्यूज

कॅलिफोर्निया : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बेवॉच’ स्टार पामेला अँडरसन ही पाचव्यांदा लग्नाच्या बेडीत अडकली आहे.नाताळच्या मुहूर्तावर पामेलाने तिचा बॉडीगार्ड डॅन हेहर्स्ट सोबत लग्न झाल्याचे समोर आले आहे.कॅनडातील वॅनकुअरमधील पामेलाच्या राहत्या घरी छोटेखानी समारंभात पामेलाने लग्न केले.“मी अत्यंत योग्य ठिकाणी आहे, माझ्यावर निरतिशय प्रेम करणाऱ्या पुरुषाच्या कुशीत”अशा शब्दात पामेलाने विवाहानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

५४ वर्षीय पामेला अँडरसनचे हे पाचवे लग्न असून गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला दोघांची भेट झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पामेला-डॅन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे पाहुण्यांची यादी मर्यादित ठेवावी लागणार होतीच, मात्र नवदाम्पत्याने मोजक्या परिजनांच्या उपस्थितीतच लग्न करायचे पसंत केले.

Exit mobile version