Marathwada Sathi

हा कोरिओग्राफर अडकला विवाहबंधनात…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : नेहा कक्कर,आदित्य नारायण यांच्या लग्नानंतर आता कोरिओग्राफर आणि अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनीत पाठकने शुक्रवारी आपली गर्लफ्रेंड निधी मोनी सिंह सोबत लग्न केले.पुनीत आणि निधीचा ऑगस्टमध्ये साखरपुडा झाला होता. या दोघांची भेट ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली होती.नवविवाहित जोडपे पुनीत आणि निधि यांनी सोशल मीडियावर आपल्या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

दरम्यान,पुनीत चा विवाहसोहळा लोणावळ्यातील जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. पुनीत आणि निधि यांच्या लग्नसोहळ्यासाठी भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, यशस्विनी दयामा, शक्ती मोहन, कोरिओग्राफर धर्मेश येलांडे देखील उपस्थित होते.

Exit mobile version