Home मनोरंजन या बॉलीवूड गायिकेने शेअर केला लग्नानंतरचा पहिला फोटो…!

या बॉलीवूड गायिकेने शेअर केला लग्नानंतरचा पहिला फोटो…!

5385
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड गायिका शिल्पा राव आपल्या बालपणीचा मित्र रितेशसोबत विवाहबंधनात अडकली आहे.शिल्पा आणि रितेश गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रितेशसोबत लग्न केल्याची जाहिर केले आहे. कृष्णा व्यवसायाने छायाचित्रकार असून २५ जाने.रोजी त्यांनी लग्न केले आहे.शिल्पाने घुंघरु टूट गए, बुलेया अशी सुपरहिट गाणे गायली आहेत.

दरम्यान,लग्नानंतरची पहिली सेल्फी शेअर करत शिल्पाने त्याला कॅप्शन दिले आहे की,आमची पहिली सेल्फी मिस्टर अँड मिसेस बनल्यानंतर शिल्पाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.बॉम्बे टाईम्सशी बोलताना शिल्पा राव म्हणाली की, आमचे आई-वडिल सीनियर सिटिजन आहेत. त्यामुळे आम्ही लग्न कमी लोकांमध्ये उरकून घेतले.अगदी साध्या पध्दतीने आमचा विवाह सोहळा पार पडला घर फुलांनी समवले होते तर माझ्या भावाच्या बायकोनेच माझी मेहंदी काढली होती.सायंकाळी पाच वाजता घरात आमचे लग्न झाले.माझे मित्र आणि कुटुंबीय व्हिडिओ कॉलद्वारे या लग्नात सामील झाले होते.

https://www.instagram.com/p/CKi-qq8gKgz/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here