Marathwada Sathi

महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : कोरोनाकाळात कामकाजाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे बऱ्याच क्षेत्रातील कामाच्या नियमांमद्येही बदल करण्यात आले आहेत. दरम्यान,कामगार मंत्रालयाने महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

यामध्ये वेतनापासून कामावर बदल करण्याची योजना आखण्यात आली आहे.शिवाय पेमेंट आता डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे महिलाना कमी वेतन मिळण्याची समस्या दूर होणार आहे. याचा फायदा कामगार महिलांना मोठ्या प्रमाणात होईल.

या संहितेत असलेल्या महितीनुसार, कामगारांना खाणकामसह इतर अनेक क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते.फक्त हेच नाही तर पगाराच्या बाबतीतही त्यांना पुरुषांइतकाच दर्जा देण्यात यावा. सर्वांना समान वेतनाची तरतूद ,याशिवाय आतापर्यंत देशातील असंघटित क्षेत्रातील पुरुषांपेक्षा महिला कामगारांना कमी पगार दिला जात होता, परंतु पगारातील भेदभावही नव्या कामगार संहितामुळे संपून जातील.

महिला कामगारांनाही खाणकाम, बांधकाम इत्यादी सर्व क्षेत्रात काम करण्याची मुभा दिली जाईल. आतापर्यंत महिला कामगारांना खाणकाम आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी नव्हती.

Exit mobile version